User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

नमस्कार,

तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेला आहात; तिथे जर तुम्हाला प्लँस्टिकच्या बाटल्यांचा किंवा रॅपरचा खच दिसला तर कसं वाटतं... तुम्ही ओढ्याच्या खळाळत्या पाण्याचा किंवा एखाद्या पक्ष्याचा आवाज ऐकण्यात गुंग असताना कुणी स्पीकरवर गाणी ऐकत बाजूने गेलं तर?... तुम्ही माकडाला खाऊ देत असताना, माकडाने सोबतच्या लहान मुलाच्या हातातील पदार्थावर झडप घातली आणि चुकून चावा घेतला किंवा ओरबाडलं तर??... या जर-तर च्या गोष्टी असल्या तरी घडणार नाहीत याची काहीच शाश्वती नाही. त्यामुऴेच सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांत फिरताना काय करावे किंवा करू नये, यासाठी अनेक वर्षे सह्याद्रीत भटकणाऱ्या सह्याद्री मित्रांनी 'रिस्पॉन्सिबल टुरिझम'ची म्हणजेच 'जबाबदारीने करावयाचे पर्यटन' ही संकल्पना राबवली आहे. सह्याद्रीत किंवा इतर कोठेही फिरताना कोणत्या गोष्टीं कराव्यात अथवा करू नये, हे विविध माध्यमांतून सांगण्याचा प्रयत्न 'सह्याद्री मित्र' करणार आहेत. तरी, आपल्यापर्यंत पोहोचलेला हा संदेश इतरांनाही फाँरवर्ड करून निसर्गसंवर्धनाच्या या कामी हातभार लावावा .

आपले - सह्याद्री मित्र : www.sahyadri.net