User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

महाराष्ट्र – स्वतः एक संपूर्ण राष्ट्र होऊ शकेल अशी ताकद असणारा प्रदेश. पूर्वीचे दंडकारण्य. राजमान्य राजश्री शिवछत्रपतींचा महाराष्ट्र. काय आहे या महाराष्ट्रात? नव्हे; काय नाही या महाराष्ट्रात? ३,०८,००० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ सामावून घेणारा, पश्चिमेला अरबी महासागर असणारा, भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा प्रचंड प्रदेश. सह्याद्रीसारखा दणकट कणा लाभलेला, दऱ्या-खोऱ्यांनी वेढलेला, नद्या-नाल्यांनी समृद्ध झालेला, घनदाट अरण्यांनी व्यापलेला, प्राणी-पक्षी-वनस्पतीचे जैववैविध्य राखणाऱ्या या आपल्या महाराष्ट्रामध्ये काय नाही? एखाद्याने बालपणापासूनच महाराष्ट्रातील प्रत्येक स्थळाला भेट द्यायचा निश्चय केला तरी त्याचे आख्खे आयुष्य या भटकंतीस कमीच पडावे. पण आपणच काय ते कपाळकरंटे म्हणून महाराष्ट्रातील ही पवित्र, प्राचीन, निसर्गरमणीय स्थाने सोडून इतरत्र भटकत बसतो. का व्हावे असे? याचे कारण म्हणजे आपल्याला या ठिकाणांची माहिती नसते किंवा असल्यास ती अपुरी असते. तर मित्रहो, आम्ही हा प्रश्नही चुटकीसरशी सोडवला आहे. ‘रॉक क्लाईंबर्स क्लब’ तर्फे ‘गोरिला अॅडव्हेंचर्स’ यांच्या सहयोगाने आपल्यासाठी ‘सह्याद्री – कणा महाराष्ट्राचा’ या गिर्यारोहण आणि पर्यटनाला अर्पण असलेल्या या आगळ्या-वेगळ्या संकेतस्थळाद्वारे आम्ही आपल्याला, महाराष्ट्रातील अश्याच ज्ञात-अज्ञात स्थळांची माहिती पुरवणार आहोत; आणि तुम्हाला करायचं आहे ते फक्त या स्थळांना भेट देण्याचं काम.

संकेतस्थळाचा वापर कसा कराल? हे संकेतस्थळ कसे वापरावे याची थोडक्यात माहिती:

‘महाराष्ट्र माझा’मध्ये महाराष्ट्रातील पर्यटन / भटकंतीच्या ठिकाणांची माहिती मिळेल. या विभागात चार उपविभाग आहेत. ‘कणखर देशा’ विभागात महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती उपलब्ध होईल. ‘राकट देशा’ विभागात ‘लेणी आणि गुंफा’ यांविषयी माहिती मिळेल. ‘दगडांच्या देशा’ विभागात ‘प्रस्तरारोहण’ म्हणजेच ‘रॉक क्लायंबींग’ विषयीची माहिती मिळेल. ‘पवित्र देशा’ विभागात ‘मंदिरे आणि इतर पर्यटन’ स्थळांची माहिती मिळेल. तर ‘कोमल देशा’ विभागात ‘निसर्ग आणि पर्यावरण’ याविषयी माहिती उपलब्ध होईल. ‘इतर महत्वाचे’ विभागात इतर मौल्यवान माहिती तसेच छायाचित्रे, नकाशे, कविता, इतर लेख इत्यादी माहिती उपलब्ध होईल. 

‘छत्रपती शिवराय’ विभागात शिवाजी महाराजांविषयी माहिती आणि त्यांची चित्रे उपलब्ध होतील. ‘सह्याद्री मित्र’ विभागात ‘रॉक क्लाईंबर्स क्लब’ तर्फे ‘गोरिला अॅडव्हेंचर्स’तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सह्याद्री मित्र स्नेह संमेलना’विषयी माहिती मिळेल. तर ‘सह्याद्री - कणा महाराष्ट्राचा मासिक’ विभागात ‘रॉक क्लाईंबर्स क्लब’ तर्फे ‘गोरिला अॅडव्हेंचर्स’तर्फे २०११ ते २०१५ असे पाच वर्षे सतत सुरु ठेवलेल्या ‘सह्याद्री - कणा महाराष्ट्राचा’मासिकाविषयी माहिती मिळेल तसेच सर्व अंक विनामूल्य डाऊनलोड करता येतील.

त्याचप्रमाणे वेळोवेळी गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यावरण यांच्याशी निगडीत इतर माहितीही या संकेतस्थळावर देण्यात येईल. तर मग या संकेतस्थळाला भेट देत रहा आणि भटकत रहा!!  काय मग.. करताय ना सुरुवात??  शुभ यात्रा!!