User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
शिवडी
जिल्हा : मुंबई उंची : लागू नाही
तालुका : मुबई प्रकार : भूदुर्ग / मिश्रदुर्ग
परिसर : शिवडी ऋतू : सर्व
स्थळ : शिवडी श्रेणी : सोपी – १
डोंगररांग : लागू नाही भटकंती : बरी

प्रवास :

मुंबईमध्ये आजमितीस तग धरून राहिलेल्या किल्ल्यामधील एक किल्ला म्हणजे ‘शिवडी’चा किल्ला. हे किल्ले तत्कालीन पहाऱ्याची ठिकाणे होती. मुंबईतल्या किल्ल्यामध्ये नशीबवान निघालेला असा हे एकच किल्ला आहे. हा किल्ला मुंबईतल्या शिवडी येथे आहे, त्यामुळेच तो शिवडीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. त्या काळात त्याचे नाव काही दुसरे असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

किल्ल्याला भेट देण्यासाठी, स्वतःची गाडी नसल्यास, लोकल रेल्वे हेच उत्तम साधन आहे. रेल्वेने हार्बर मार्गावरील ‘शिवडी’ रेल्वेस्थानकास यावे. शिवडीच्या पश्चिम दिशेला उतरून ‘कोलगेट पामोलिव’ कंपनीकडे जाणारा सरळ रस्ता पकडावा. ह्या रस्त्याने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण शिवडी किल्ल्याजवळ येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. वाटेत हजरत सैय्यद जलाल शहा दर्गा आहे.

माहिती :

कोलगेट पामोलिव कंपनीच्या दक्षिण दिशेला शिवडीचा किल्ला दिसून येतो. खरंतर हा किल्ला कंपनीच्या आधीपासून येथे आहे. पण आता तो दुर्लक्षित असल्याने किल्ला जास्त कोणी ओळखत नाही. दर्ग्याच्या वाटेने पायऱ्यांनी हा किल्ला जवळ करावा. किल्ल्याचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला आहे. अगदी १०-१२ फुट उंचीचे प्रवेशद्वार असणारा हा किल्ला एका लहान इमारतीच्या आकाराएवढाच लहान आहे. हो! मात्र याचं आकार एखादे रत्न असावे असा आहे. किल्ला लहानुला असला तरी टिकून आहे. आधी त्याला नशीबवान म्हणण्याचे कारण म्हणजे आता पुरातत्व खात्याने डागडुजी केल्याने त्याला नवलाई प्राप्त झाली आहे. मात्र या ‘सिमेंटी’करणामुळे त्याचे मूळ स्वरूप हरवले आहे याची खंत दर्दी भटक्यांना झाल्याशिवाय राहणार नाही.

दक्षिण बुरुजाखालील दरवाज्यातून आत शिरून उजवीकडे (उत्तरेला) वळून किल्ल्यात प्रवेश करतो. उजव्या बाजूला सुरु होणाऱ्या पायऱ्यांनी बुरुजावर जाता येते. किल्ल्यात शिरताच त्याचा आकार लहान असल्याचे कळून येते. डाव्या बाजूला दोन मोठी कोठारसदृश्य बांधकामे दिसतात. दोन्ही कोठारे जवळपास समान आकाराची आहेत. बहुदा हे कारखाने किंवा सामान साठवण्याच्या जागा असाव्यात. ब्रिटीश राजवटीत त्यांचा उपयोग कोठार म्हणून केल्याचे आढळते. समोर उत्तरेला एक दरवाजा दिसतो. त्याखाली पायऱ्या आहेत. उत्तरेच्या बुरुजाखाली दरवाज्याने आत शिरल्यावर डावीकडे एका अरुंद पोकळीत आपण शिरतो. येते छत नाही. या भागात शिडी लावून वर जाण्याची सोय आहे. बहुदा पूर्वीसुद्धा ती तशीच असावी. बाहेरील भागात १२-१५ फुट जागा सोडून तटबंदी बांधली आहे.

या शिवाय किल्ल्यावर पाहण्यासारखे काही नाही. किल्ल्याची समुद्राकडील बाजू म्हणजेच ‘शिवडीची खाडी’. हे स्थान ‘फ्लेमिंगो’ म्हणजेच ‘रोहित’ पक्ष्यांचे आवडते ठिकाण असून दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो इथे येतात आणि त्यांना पाहण्यासाठी पर्यटकसुद्धा येथे ओढले जातात.

असा हा छोटेखानी किल्ला पाहण्यासाठी अर्धा - एक तास पुरेसे होतात. त्यामुळे विरार-वसई जवळ असणारी इतर स्थळे पाहण्यास उरलेला वेळ वापरला जाऊ शकतो.

सोयीसुविधा :

निवारा: हा किल्ला थोड्याच वेळात पाहून होत असल्याने तेथे राहण्याची आवश्यकता भासत नाही. किल्ला मुंबई सारख्या शहरात असल्याने राहण्यासाठी विश्रांतीगृहांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

जेवण: किल्ल्यावर उपहारगृहे वैगरे नाहीत. त्यामुळे खाद्यपदार्थ स्वतःचे स्वतः बाळगावेत. किल्ला मुंबई सारख्या शहरात असल्याने अनेक चांगली उपहारगृहे उपलब्ध आहेत.

पाणी: किल्ल्यावर पाण्याच्या सोय नाही. त्यामुळे पाण्याची व्यवस्था स्वतःच करावी.

सूचना :

लागू नाही.
 

छायाचित्रे :

  • shiwdi-01
  • shiwdi-02

Simple Image Gallery Extended