तयारी डोंगरयात्रेची..

डोंगरयात्रा (ट्रेक) करणे ही आजकाल एक ‘फॅशन’ झाली आहे. कोणीही उठतो आणि डोंगरयात्रा करू पाहतो. याचे कारणही उत्तम आहे. काही अनुभवी डोंगरयात्री स्थानिक मंडळे स्थापन करून अल्प खर्चात डोंगरयात्रांचे आयोजन करतात. अशा डोंगरयात्रांमध्ये अनेक हौशी बिन-अनुभवी मंडळी सामील होतात.

अशी मंडळी अनुभव नसल्याने बऱ्याचदा मंद चालणे, अतीथकवा, उंचीची भिती यांनी ग्रासलेली असतात. त्यामुळे ट्रेक दरम्यान गट एकत्र ठेवण्यास आयोजक असमर्थ ठरतात व ह्याकडे ते सर्रास दुर्लक्षही करतात. नवीन सहभागी ट्रेकचा आनंद घेऊ शकत नाहीतच त्यात थकव्यामुळे स्थलदर्शन, निसर्गदर्शन करण्यासही ते विसरतात. निर्जलीकरण, शरीरावर अती ताण यांमुळे ट्रेकच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना डॉक्टरची भेट घ्यावी लागते व अल्प खर्चिक वाटणारा हा ट्रेक अती-खर्चिक होऊन बसतो. एखाद-दुसरा ट्रेक करून योग्य मार्गदर्शक न मिळाल्यामुळे ते कंटाळतात आणि पुन्हा ट्रेकच्या ‘भानगडीत’ पडत नाहीत. अशाने ट्रेकर्सचे कळपच्या कळप घेऊन जाणारी मंडळे ‘गडगंज’ होतात आणि नवखी मंडळी मात्र खऱ्या ट्रेकना व तेथील निसर्गसौंदर्याला कायमची मुकतात.

अल्प खर्चिक, योग्य नियोजन असणारी सर्वांग सुंदर डोंगरयात्रा नक्कीच करता येऊ शकत मात्र ती करण्यासाठी योग्य तयारी केली पाहिजे. ती कशी करावी याची माहिती या विभागात प्रस्तुत केले आहे.

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive

डोंगरयात्रा (ट्रेक) म्हणजे एखाद्या ओळखीच्या डोंगरावर थोडेसे कष्ट करून पोहोचण्याचा आनंद देणारी भटकंती. या भटकंतीत अशा डोंगराची निवड करण्यापासून शेवटी घरी सुखरूप पोहोचण्यापर्यंत सर्व गोष्टी समाविष्ट होतात. यावरूनच ट्रेक म्हणजे एखादी सहल किंवा उधाण पिकनिक नाही हे नमूद केले पाहिजे. ट्रेकची तयारी युद्धपातळीवर करावी लागते. आणि ती तशी करणे अनिवार्य आहे. अनेक अनुभवी संस्था, हौशी ट्रेकर्स ट्रेकवर नेण्याआधी ‘पायलट ट्रेक’ म्हणजेच ‘प्रार्थमिक यात्रा’ आयोजित करतात.

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive

डोंगरयात्रेचे तंत्र-मंत्र? म्हणजे काय? डोंगरयात्रेत कसले आलेत तंत्र-मंत्र? हे सगळे प्रश्न तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. पण होय, डोंगरयात्रेतही तंत्र-मंत्र असतात. परंतु ते अगदी सामान्य असल्याने त्यांच्याकडे अनेकजण दुर्लक्ष्य करतात आणि मग अडचणीत सापडतात. त्यामुळे कोणतीही डोंगरयात्रा, मग ती लहान का असेना, सुरु करण्यापूर्वी हे तंत्र-मंत्र पाळले गेले पाहिजेत. आधी नमूद केल्याप्रमाणे डोंगरयात्रेत डोंगरयात्रेत डोंगरयात्रेचे ठिकाण ठरवण्यापासून ते निरोपाच्या ठिकाणी सुखरूप पोहोचेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे प्रत्येक डोंगरयात्रेपूर्वी आणि दरम्यान पुढील गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे व ह्या सर्व गोष्टीत नेत्याने कटाक्षाने वैयक्तिक लक्ष्य घालणे आवश्यक आहे.

इतर अनुभवी डोंगरयात्रींकडून किंवा संस्थांकडून ठरविलेल्या डोंगरयात्रेच्या, प्रार्थमिक यात्रेची माहिती, नोंदी, रेखाटने नमूद करून घ्याव्यात. उदा. सुरुवातीचे स्थळ, तेथून डोंगराच्या पायथ्याचे गाव व त्याचे सुरुवातीच्या स्थळापासूनचे अंतर, गावातील पोलीस पाटलांचे संपर्क, डोंगरावर जाणाऱ्या इतर वाटा, त्यातील सोप्या वाटा व कठीण वाटा, पायथा ते माथा अंतर (कि.मी. मध्ये अंतर, फूट किंवा मीटर मध्ये उंची, तासांमध्ये वेळ), पाणवठे (पिण्याच्या पाण्याचे वेगळे), जेवण / न्याहारी उपलब्ध होण्याच्या जागा, निवाऱ्याच्या जागा, माथ्यावरील निरीक्षणे (जसे किल्ल्याचे अवशेष, देवळे, गिरिस्थाने, गुहा, तलाव, टाकी, लेणी इत्यादी), रेखाचित्रे इत्यादी.