User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

डोंगरयात्रा (ट्रेक) म्हणजे एखाद्या ओळखीच्या डोंगरावर थोडेसे कष्ट करून पोहोचण्याचा आनंद देणारी भटकंती. या भटकंतीत अशा डोंगराची निवड करण्यापासून शेवटी घरी सुखरूप पोहोचण्यापर्यंत सर्व गोष्टी समाविष्ट होतात. यावरूनच ट्रेक म्हणजे एखादी सहल किंवा उधाण पिकनिक नाही हे नमूद केले पाहिजे. ट्रेकची तयारी युद्धपातळीवर करावी लागते. आणि ती तशी करणे अनिवार्य आहे. अनेक अनुभवी संस्था, हौशी ट्रेकर्स ट्रेकवर नेण्याआधी ‘पायलट ट्रेक’ म्हणजेच ‘प्रार्थमिक यात्रा’ आयोजित करतात.

र्थमिक यात्रा (पायलट ट्रेक) म्हणजे कोणत्याही डोंगरयात्रेआधी, त्या यात्रेच्या मार्गाचा, तेथे उपलब्ध सोयी-सुविधा, जसे पाणवठे, उपहारगृहे, निवारे किंवा मुक्कामाच्या जागा, अपघातप्रसंगी संपर्क करता येणाऱ्या व्यक्ती इत्यादींची माहिती गोळा करून ती डोंगरयात्रा नवख्या यात्रींसाठी सुरक्षित व आल्हाददायक बनविणे. अशा यात्रा ह्या अत्यावश्यक असतात, अनोळखी डोंगरांवर तर त्या अनिवार्य होतात. आता पुढील प्रश्न हा की लहान संस्थांना किंवा नवख्या हौशी गिर्यारोहकांना अशा ‘प्रार्थमिक यात्रा’ आयोजित करणे कितपत परवडण्यासारखे असेल. तर याचे उत्तर असे की आज महाराष्ट्रामध्ये तरी असे अनोळखी डोंगर फारच कमी आहेत. व लहान संस्था किंवा नवख्या हौशी गिर्यारोहकांचा आधी ओळखीच्या यात्रा करण्याकडेच कल राहील. त्यामुळे त्यांना अशा ओळखीच्या डोंगरयात्रांची माहिती मोठ्या, अनुभवी संस्थांकडून उपलब्ध होऊ शकेल. कारण अनुभवी संस्थांनी अशा अनेक अनोळखी डोंगरांवर आगोदरच ‘प्रार्थमिक यात्रा’ आयोजित करून असे डोंगर ज्ञात करून घेतले आहेत. त्यात प्रत्येक डोंगरावर एक तरी पर्यटनस्थळ आढळून आल्याने तेथे पर्यटक किंवा गिर्यारोहकांची ये-जा सुरूच असते. त्यामुळे सह्याद्री मध्ये तरी, अती दुर्गम डोंगर वगळल्यास पायलट ट्रेकची गरज भासत नाही. अशा प्रार्थमिक यात्रांदरम्यान मिळवलेली अशा स्थळांची सखोल माहिती आज पुस्तके, लेख, ब्लॉग्स, संकेतस्थळे यांमार्फत आपल्याला उपलब्ध आहे. तसेच वेळोवेळी तेथे जाऊन येणाऱ्या व्यक्ती, संस्थांकडूनही अद्ययावत माहिती नोंदून घ्यावी.

कोणत्याही डोंगरयात्रेसाठी यांशिवायाही इतर बरीच तयारी करावी लागते, त्याची माहिती या विभागात दिली आहे.