User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

नमस्कार मित्रांनो,

२०११ ते २०१५ असे पाच वर्षे सतत सुरु ठेवलेले आपले मासिक ‘सह्याद्री - कणा महाराष्ट्राचा’ तुमचे आवडते झाले होते हे आपण दिलेल्या प्रतिसादावरून दिसून आले. या पाच वर्षांत एकूण एकोणसाठ अंक आम्ही आपल्याला सादर केले. त्यातून खूप उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. आपणही ती जशी आहे तशी स्वीकारली; तिचे कौतुक केले.

या मासिकातून विविध सदरांतून गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यावरण या विषयांवर विविध माहिती पुरवण्यात आली. अनेक छायाचित्रे प्रसिध्द केली गेली. या क्षणाचे निमित्त साधून आम्ही आपल्याशी काही हितगुज करू इच्छितो. या मासिकाची संकल्पना मांडणारे श्री. उत्कर्ष एरंडकर, त्यामध्ये लाक्षणिक बदल घडवून आणणारे श्री. अनुराग वैद्य आणि अनेक वर्षे त्यातील लेखांमध्ये सुधारणा करून देणारे श्री. महेश ताम्हनकर यांचे विशेष आभार आम्ही इथे प्रकट करतो. मासिकामध्ये उत्तम बदल करण्यासाठी श्री. दिलीप मिसाळ, श्री. निरंजन मराठे, श्री. काशिनाथ परब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

मासिकातील अनगड ठिकाणांची माहिती जमविण्यासाठी जे ट्रेक्स केले गेले त्यांचे यशस्वी नेतृत्व करण्यासाठी श्री. प्रथमेश देशपांडे, श्री. निरंजन मराठे, श्री. अनुराग वैद्य यांनी पुढाकार घेतला. श्री. उत्कर्ष एरंडकर (महाराष्ट्र देशा), श्री. अनुराग वैद्य (महाराष्ट्राची दुर्गरत्ने), श्री. निरंजन मराठे (राकट देशा), श्री. पंकज समेळ (पवित्र देशा), श्री. ओंकार ओक (आडवाटा), कु. तन्मयी मेहेंदळे (तरुणीची भटकंती), श्री. विक्रमसिंह सूर्यवंशी (जिप्सी), श्रीमती रुपाली देशिंगकर (कोमल देशा), श्री. शंतनू परांजपे (माझ्या लेखणीतून) इत्यादी हरहुन्नरी आणि अभ्यासू व्यक्तींचे लेख मासिकाला लाभले. श्री. मंगेश नलावडे, श्री. केदार दिवेकर, श्री दिगंबर पांचाळ, श्री. अनिकेत वाघ, श्रीमती स्वाती शिवशरण आणि इतर कवींनी वाचकांसाठी उत्तम कविता सादर केल्या.

दुर्गवीर प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान, शिवाजी ट्रेल, श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, शिवअस्मिता सामाजिक संस्था, शिवकार्य गडकोट संवर्धन मोहीम, निसर्गमित्र या आणि इतर संस्थांनी चांगले कार्य करून मासिकाला एक सामाजिक दृष्टिकोन दिला.

श्री. प्रथमेश देशपांडे, श्री. काशिनाथ परब, श्री. विनीत दाते, श्री. नितीन पाटोळे, श्री. निरंजन मराठे, श्री. शंतनू तिजारे, श्री. विनय जाधव, श्रीमती ज्योती साठे, श्री. वैभव साठे, श्री. ओंकार ओक, श्री. पंकज समेळ, श्री. हर्ष पवळे आणि इतर मंडळींनी उत्तमोत्तम छायाचित्रे मासिकाला दिली.

श्री. विक्रमसिंह सूर्यवंशी (स्ट्रॉब शॉप) आणि श्री. नंदू चव्हाण (माउंटन स्पोर्ट्स अकाडमी) यांनी वेळोवेळी विविध साहित्य आणि साधने आपल्या वाचकांसाठी उत्तमोत्तम किमतींमध्ये उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

इतर अनेक लेखक, कवी आणि अभ्यासू व्यक्तींनी मासिकाला वृद्धींगत होण्यास मदत केली. त्यातील अनेकांची नावे इथे न लिहिता त्यांच्या ऋणात राहणेच आम्ही पसंत करू.

‘रॉक क्लायंबर्स क्लब’चा मुख्य उद्देश हा महाराष्ट्रातील गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यावरण या विषयांवर विविध माहिती पुरवून जनमानसांत या विषयांची रुची निर्माण करून त्याचा विकास करणे हा आहे. त्यासाठी लोकोपयोगी संकेतस्थळ सुरु करण्याचा आमचा प्रयत्न होता. पण त्यासाठी वेळ लागणार असल्याने त्या कालावधी करता ‘सह्याद्री - कणा महाराष्ट्राचा’ हे मासिक सुरु करण्यात आले होते. मात्र आज आपले हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे आणि त्यावर गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यावरण या विषयांवर विविध माहिती पुरवण्यात येणार आहे. मासिकाची आठवण ताजी राहावी म्हणून हे संकेतस्थळसुद्धा ‘सह्याद्री - कणा महाराष्ट्राचा’ याच नावाने सुरु करण्यात आले आहे. तरी मासिकाप्रमाणे संकेतस्थळावरसुद्धा आपल्या कौतुकाची थाप पडू द्या आणि महाराष्ट्रातील गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यावरण यांच्या विकासासाठी पाठींबा द्या.

‘सह्याद्री - कणा महाराष्ट्राचा’ या मासिकाचे सर्व अंक पुढील लिंकद्वारे मोफत डाउनलोड करण्यात येतील.

येथे क्लिक करून डाऊनलोड करून घ्या.

आपले प्रेम आमच्यावर असेच राहू द्या. त्यातून आम्हाला अशीच प्रेरणा मिळत राहू द्या.

कळावे. लोभ असावा.

टीम रॉक क्लायंबर्स क्लब