सह्याद्री-मित्र

महाराष्ट्राने आपल्याला भरभरून दिले आहे. आपणही या प्रेमामुळे सह्यवेडे झालो आहोत. आपल्यातील अनेकजण सह्याद्रीला भेटण्यास उत्सुक असतात. कित्येकजण दर आठवड्याला, शनिवार-रविवारच्या सुट्ट्या सह्याद्रीसोबत घालवतात. या सह्यभटक्यांमध्ये अनेक प्रकार आहेत. गिरीमित्र, दुर्गमित्र, प्रस्तरमित्र, निसर्गमित्र, इतिहासमित्र, भूगोलमित्र, अवकाशमित्र, साहसमित्र आणि असे अनेक.. परंतु या असंख्य सह्यभटक्यांमध्ये, प्रत्येकात हमखास दिसून येतो तो, ‘सह्याद्री-मित्र’...


पल्यातील अनेकजण, गिर्यारोहक आहेत, गिरीभ्रमर आहेत, दुर्गप्रेमी आहेत, पर्यटनप्रेमी आहेत, छायाचित्रकार आहेत, चित्रकार आहेत, शिवभक्त आहेत, दुर्गसंवर्धक आहेत, निसर्गसंवर्धक आहेत, इतिहाससंशोधक आहेत, ग्रामसंवर्धक आहेत, प्रस्तरारोही आहेत, मार्गदर्शक आहेत, लेखक आहेत. महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या कुशीत अखंड भटकंती करणारे, अश्या भ्रमंती घडवून आणणाऱ्या आयोजक व्यक्ती आणि संस्था आहेत. आपल्यातील प्रत्येकजण, महाराष्ट्र आणि सह्याद्रीचे पांग, कोणत्या न कोणत्या प्रकारे फेडण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रात राहून इतर राज्यांमध्ये, देशामध्ये भटकणारे, भटकवून आणणारे अनेकजण भेटतात. पण ह्या मराठी मातीचे पांग फेडण्यासाठी, तिच्या विकासासाठी भटकणारे,  भटकवून आणणारे आणि इतर जिल्ह्यातील आपल्या बांधवाना भेटी देणारे थोडकेच.. हो! पण आता ही संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र आपले हे सर्व सह्याद्री मित्र विखुरलेल्या स्वरुपात आहेत आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी, एका व्यासपीठाची नितांत आवश्यकता भासू लागली होती.

गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यावरण विकासाचे उपक्रम राबविण्यात ‘रॉक क्लाईंबर्स क्लब’ नेहमीच आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे, ह्या उपक्रमासाठीही क्लबने पुढाकार घेतला आहे आणि आपल्यासारख्या असंख्य सह्याद्री मित्रांना वर्षातून एकदा तरी एकत्रित आणण्यासाठी, ‘सह्याद्री मित्रांचे, सह्याद्री मित्रांसाठी, सह्याद्री मित्रांतर्फे’ ‘सह्याद्री मित्र स्नेहसंमेलन’ आयोजित करण्यात येणार आहे.

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active

महाराष्ट्रातील, प्रामुख्याने सह्याद्रीतील गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यावरण, यांचा शोध, संशोधन, परिचय, प्रसिद्धी आणि विकासाचे आणि इतर संलग्न उपक्रम, ते राबविणाऱ्या व्यक्ती आणि संस्था, यांना, त्यांचे कार्य सह्याद्रीमित्रांसमोर मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘सह्याद्री मित्र स्नेहसंमेलन’ कार्यरत राहील.

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active

सर्व सह्याद्री मित्र ज्याची आतुरतेने वाट पहात होते ते ‘सह्याद्री मित्र स्नेहसंमेलन’ यथासांग पार पडले. २०१४ वर्षीचे संमेलन सह्याद्री मित्रांसाठी माहितीपर ठरले. त्याचाच घेतलेला हा आढावा:
या वर्षीचे ‘सह्याद्री मित्र स्नेहसंमेलन – २०१४’, एप्रिल महिन्याच्या १२ व १३ तारखेला,  मुंबईतील दादर येथे असणाऱ्या ‘ब्राह्मण सेवा मंडळ’ येथे आयोजित केले गेले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक उपयुक्त विषय आणि स्थळांच्या माहितीने परिपूर्ण असणारे संमेलन गिर्यारोहक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. संमेलनातील प्रवेश मुद्दाम ‘विनामुल्य’ ठेवण्यात आला, त्यामुळे सर्वच सह्याद्री मित्रांना सहज सहभागी होता आले. 

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active

सह्याद्री मित्र छायाचित्रण स्पर्धा – २०१६’ ही सह्याद्री मित्र स्नेहसंमेलनाचाच एक भाग आहे. ह्या स्पर्धेद्वारे गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यावरण विकासाला हातभार लावण्यात येईल.

मुख्यत अनेक पर्यटक पर्यटनादरम्यान छायाचित्रे काढतात, तर काही छायाचित्रकार उत्तमोत्तम छायाचित्रे टिपण्यासाठी पर्यटन करतात. म्हणजेच पर्यटन केंद्रस्थानी राहतेच आणि त्याचा विकासही होतो. म्हणूनच ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पर्यटनास विकासाला चालना देता येईल अशी आशा आहे.

ह्या वर्षीच्या छायाचित्रण स्पर्धेचा विषय आहे: ‘महाराष्ट्राची गिरीशिल्पे’

या विषयाद्वारे महाराष्ट्रातील अपरिचित आणि दुर्लक्षित लेण्यांची माहिती लोकांसमोर येऊन अशा लेण्यांना त्यांना भेट देण्यास उद्युक्त करणे, हा ह्या वर्षीच्या स्पर्धेचा उद्देश आहे.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी नियम आणि अटी:

 • 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' तत्वावर १००/- रुपयांचे प्रवेशशुल्क भरून कोणत्याही व्यक्तीस ह्या स्पर्धेत भाग घेता येईल.
 • या संकेतस्थळावर उपलब्ध केलेला 'प्रवेश अर्ज' संपूर्ण व्यवस्थित भरून तो आमच्यापर्यंत पोहोचवावा.
 • एका व्यक्तिस एकच प्रवेशिका ग्राह्य धरण्यात येईल आणि तीद्वारे, विषयाशी निगडीत कमाल ३ छायाचित्रे स्विकारण्यात येतील.
 •  प्रवेशिकेतील छायाचित्रे अर्जदार स्पर्धकाने स्वतः टिपलेली असणे आवश्यक आहे.
 • अर्ज स्वीकारल्या नंतर देण्यात येणारा 'प्रवेशिका क्रमांक' नमूद करून प्रत्येक स्पर्धक कमाल ३ छायाचित्रांच्या फाईल्स मूळ स्वरुपात आम्हाला ईमेल करेल. छायाचित्रांत कोणताही बदल करण्यास मज्जाव राहील. केवळ विशिष्ट अँगल किंवा फ्रेमसाठी छायाचित्र 'क्रॉप' (आकार कमी) करण्याची परवानगी असेल.
 • प्रवेशिकेतील छायाचित्र विषयाशी सुसंगत असावे. त्यामध्ये महाराष्ट्रातील लेणी किंवा त्यांचा भाग अथवा अवशेष दिसणे बंधनकारक राहील. त्या लेण्यांचे किंवा भाग किंवा अवशेषाचे नाव, परिसर इत्यादी माहिती स्पर्धकास असणे आवश्यक असेल.
 • प्रत्येक छायाचित्राच्या फाईलचे नाव बदलून त्यास प्रवेशिका क्रमांकांचे नाव देऊन ती फाईल आम्हाला फक्त अर्जदाराच्या ईमेलद्वारेच पाठवण्यात येईल. ईमेल मधील विषयाच्या जागी प्रवेशिका क्रमांक नमूद करणे आवश्यक असेल.
 • प्रत्येक अर्जाद्वारे स्पर्धक त्यांची छायाचित्रे, आमच्या पुढील कोणत्याही प्रदर्शनास, कोणत्याही पुर्वसुचनेशिवाय प्रदर्शित करण्याची परवानगी देईल.
 • मान्यवर परिक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम ग्राह्य धरण्यात येईल आणि सर्व स्पर्धकांना तो मान्य करणे बंधनकारक असेल.
 • स्पर्धक प्रवेशिकांतून निवडण्यात आलेली काही निवडक छायाचित्रे स्नेहसंमेलनादरम्यान प्रदर्शित करण्यात येतील. प्रदर्शनादरम्यान विजयी छायाचित्रे दर्शविण्यात येतील.
 • प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ विजयी छायाचित्रकारांना पुरस्कार देण्यात येईल.
 • प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेत सहाभागी होण्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात येईल.

स्पर्धेमध्ये प्रवेश घेण्याकरिता कृपया 'प्रवेश अर्ज' डाऊनलोड करून घ्या आणि प्रवेश शुल्क भरून झाल्यावर हा अर्ज नीट भरून आम्हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवा. - प्रवेश अर्ज

प्रवेश शुल्क जमा करण्यासाठी आमच्या बँक अकाऊंटची माहिती पुढील प्रमाणे आहे:

GORILLA ADVENTURES
ICICI BANK LIMITED
NERUL BRANCH
CURRENT ACCOUNT
NO. 040805500527
IFSC CODE: ICIC0000408
MICR CODE: 400229053